ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

शरद पवारांच्या विधानाने नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा!

मुंबई : (Sharad Pawar On Narendra Modi) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार यांनी मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नसल्याचे विधान केलं. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील या चर्चेला पुर्णविराम लागला आहे. यामुळे 2024 मध्ये पंतप्रधान होण्याचा नरेंद्र मोदींचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, मी कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी होणार नसून सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही. मोरारजी देसाईप्रमाणे मी 82 व्या वर्षी पंतप्रधान झाले. त्यांच्याप्रमाणे मी 82 व्या वर्षी पंतप्रधान होण्याचा कित्ता मी गिरवणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढावी, असं आमचं मत आहे, पण त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. मात्र,सामान्यांची प्रश्न सोडवण्यासाठी विविध लोकांना एकत्र आणण्याचे सुख माझ्या वाटेला असावं. आणि समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं, असं मत यावेळी पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये