क्रीडाताज्या बातम्या

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! धोनीनंतरच्या ‘या’ दिग्गज खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली | Suresh Raina Announce Retirement From All Formats Of Cricket – सध्या भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनानं क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना त्यानं देशाचं आणि उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करणं अभिमानास्पद होतं, असं म्हटलं. “माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार,” असं म्हणत त्यानं कृतज्ञता व्यक्त केली आहे.

यावेळी सुरेश रैना म्हणाला, “माझ्या देशाचं आणि उत्तर प्रदेश राज्याचं प्रतिनिधित्व करणं अभिमानास्पद होतं. मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत आहे. मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज, राजीव शुक्ला आणि माझ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो.”

“या सर्वांनी माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला आणि खूप पाठिंबा दिला”, असंही सुरेश रैनानं म्हटलं आहे. तसंच रैनानं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी तो 10 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी सीरिजमध्ये खेळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये