आदर्श विद्यार्थी घडविण्यात गृहपालांची भूमिका महत्त्वाची- डॉ. प्रशांत नारनवरे
![आदर्श विद्यार्थी घडविण्यात गृहपालांची भूमिका महत्त्वाची- डॉ. प्रशांत नारनवरे pune 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/09/pune-2-780x470.jpg)
पुणे : शासकीय वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी घडविण्यात गृहपालांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी पालकत्व या नात्याने जबाबदारी घेतल्यास निश्चितच समाजात आदर्श विद्यार्थी निर्माण होतील, असे मत राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या गृहपालांचे दोन दिवसाचे प्रशिक्षण अल्पबचत भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. नारनवरे बोलत होते. कार्यक्रमाला बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सहआयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त विजय गायकवाड, उमेश सोनवणे, मनिषा फुले, निशा देवी बंडगर आदी उपस्थित होते.डॉ.नारनवरे म्हणाले, समाजातील पालक मोठ्या अपेक्षेने त्यांच्या पाल्यांना शासकीय वसतीगृहात पाठवत असतात. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्यात आदर्श विद्यार्थी निर्माण कसे होतील यासाठी देखील गृहपालांनी सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.