ताज्या बातम्यापुणेरणधुमाळीसिटी अपडेट्स

“…तर ते परत जाणार नाहीत”, पुण्यातील घोषणाबाजीनंतर नितेश राणेंचा इशारा

पुणे | Nitesh Rane’s Warning After Sloganeering In Pune – पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर’, ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणाबाजीवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. तसंच “यापुढे कोणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावले, तर ते परत घरी जाणार नाहीत” असा इशारा राणे यांनी दिला आहे. या घोषणाबाजीविरोधात रस्त्यावर उतरू, गरज वाटल्यास घरात घुसू, असंही राणे म्हणाले.

“आमच्या देशात राहून कोणी जर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत असतील, तर पोलीस खात्यानं त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशा प्रवृत्तींची हिम्मत तोडण्याचं काम पोलिसांनी करावं. आम्हाला आमचा देश आणि राज्य वाचवायचं आहे. देशाकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांविरोधात आम्ही लढत आहोत. पुण्यातील नारेबाजीमुळे राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकारावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. राज्यातील हिंदूत्ववादी सरकारने या लोकांवर कारवाई करावी”, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. ते ‘टीव्ही 9’ या वृत्त वाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, ‘पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात शुक्रवारी सायंकाळी मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी केली. या घोषणाबाजीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी आंदोलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये