महाराष्ट्ररणधुमाळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; यंत्रणा सतर्क

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही गुप्तचर यंत्रणेला माहिती मिळाली आहे. तर गेल्या महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात आले होते. तसेच एक फोन देखील धमकीचा आला होता. या प्रकरणावर आता राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

तसेच काही दिवसापूर्वी शिंदेंना आधीच नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात त्यांच्यासह कुंटुंबियांनवर जिवघेणा हल्ला होऊ शकतो अशी धमकी देण्यात आली. तर आमच्या दलमच्या अनेक साथीदारांना तुम्ही आल्यापासून शहीद व्हावं लागलं आहे. यामुळे त्याचा बदला लवकरच आम्ही घेणार असे धमकीवजा पत्र माओवादी या नावाने ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहचल्याची माहिती देण्यात आली होती. याची किंमत शिंदें व त्यांच्या परिवाराला चुकवावी लागेल. अशी धमकी पत्रात देण्यात आली होती.

दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिली आहे की,”एकनाथ शिंदे यांचे सरकार ज्या दिवसापासून महाराष्ट्रात आले आहे तेव्हापासून विरोधकांच्या पोटात दुखत असून त्या लोकांना अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. पण अशा प्रकारची प्रवृत्ती आम्ही खपवून घेणार नाही याच्या मुळाशी कोण आहे याचा तपास केला जाईल.”अशा शब्दात दारेकारांनी इशारा दिला आहे. तर या जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे धमकीची माहिती मिळाल्यानंतर अशा धमक्यांना मी घाबरत नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा यंत्रांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये