“…म्हणून आदिपुरूष महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही”, राम कदमांची आक्रमक भूमिका

मुंबई | Ram Kadam On Adipurush Movie – ‘आदिपुरूष’ (Adipurush) या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. यामध्ये आता या चित्रपटावर भाजप आमदार राम कदम यांनी टीका केली आहे. ‘हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही’, असं ट्विट राम कदम (Ram Kadam) यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली आहे. तसंच आदिपुरूष या चित्रपटात देवदेवतांचं विडंबन केलं आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.
राम कदम यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “आदिपुरूष हा चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. तुटपुंजी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आदिपुरूष चित्रपटात निर्मात्यांनी आपल्या देवी देवींचं विडंबन करून कोट्यावधी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे. त्यांनी माफीनामा द्यावा.”
“चित्रपटाची दृष्य कट करून काही होणार नाही. अशा घृणास्पद विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. तसंच जे लोक यासाठी जबाबदार आहेत, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काही वर्षांसाठी बॅन केलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात असं करण्याचं धाडस कोणी करणार नाही”, असंही राम कदम यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.