ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उदयनराजेंनी नेमका इशारा कोणाला? म्हणाले… “नाही तर लोक स्वतःच्या हातात सत्ता घेतील”

सातारा : (Udayanraje Bhosale On Government officer’s) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या काॅलर उडवण्याच्या खास शैलीमुळे राज्यात चर्चेत आहेत. त्यांची ही दबंग स्टाइल अनेक तरुणांच्या मनावर राज्य करत असते. प्रत्येक राजकारणी आपल्या एक ना अनेक खास कारणांमुळे फेसम असतात.

उदयनराजे साताऱ्यात एका कार्यक्रम बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी ते म्हणाले, “लोकांचा एवढा अंत पाहू नका, नाही तर लोक स्वतःच्या हातात सत्ता घेतील आणि प्रशासनाला ओळखत नाही असे म्हणतील याप्रकारची परिस्थिति होवू देवू नका”, असं त्यांनी प्रशासकीय आधिकाऱ्यांना ठणकावलं. राज्यात भाजपचे सरकार आहे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी शासनाच्या आदेशाने काम करत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आडून उदयनराजेंना नेमका कोणाला इशारा देयचा आहे, यावर सध्या चर्चा सुरु झाली आहे.

यावेळी उदयनराजेंनी आपला रांगडेपणा दाखवून दिला, ते थेट स्टेज वरून उतरून खाली जमिनीवर मांडी घालून बसून बसले. वाडगं घेऊन कसं बसायचं हेही यावेळी त्यांनी दाखवलं आहे. लोकांचे कल्याण झाले पाहिजे अशीच माझी अपेक्षा आहे असं देखील उदयनराजे यांनी सांगितले आहे. ते नेहमीच आपल्या वेगळ्या पणामुळे चर्चेत आसतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये