पुणेसिटी अपडेट्स

कष्टकरी कामगार पुतळा गेला कुणीकडे?

येरवड्यातील ऐतिहासिक कामगार पुतळा झाला गायब

पुणे : पुणे शहराचे प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, येरवडा उपनगर भागातील ऐतिहासिक वारसा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या व ब्रिटिशकालीन उभारण्यात आलेला कामगार पुतळाच गायब झाल्याने याबाबत पुरातन विभागाने पाठपुरावा करण्याची गरज आहे. कारण कष्टकरी कामगार पुतळा गेला कुणीकडे ? या चर्चेला परिसरात उधाण आले आहे.
येरवडा उपनगर भागात सध्या कामानिमित्त राज्यासह परराज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले असले तरी पण इंग्रजांच्या काळात या भागासह इतर उपनगर भागात दळणवळण व्हावे या उद्देशाने १८६७ साली ब्रिटिशांच्या वतीने मुळा-मुठा नदीवर पूल उभारून त्यास बंडगार्डन पूल असे नामकरण पुलाचे करण्यात आले.

येरवडा परिसरात ब्रिटिशकालीन उभारण्यात आलेला कष्टकरी कामगार पुतळा, ही येरवड्याची ओळख होती. त्यामुळे राजकीय नेत्यांचा देखील या भागाकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा होता. त्यामुळे संबंधित कामगार पुतळा पुन्हा उभारण्यात यावा

स्वप्नील माने
प्रदेशाध्यक्ष, सामर्थ्य जनशक्ती संघटना

त्यावेळेस ज्या कामगारांचा पूल उभारणीस हातभार लाभला त्या कामगारांची आठवण म्हणून इंग्रजांच्या वतीने पुलालगतच कामगार पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण अथवा इतर जिल्ह्यातून शहराकडे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे हा पुतळा लक्ष वेधून घेत होता. पण मध्यंतरीच्या काळात असणाऱ्या पुतळ्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. विशेष म्हणजे या पुतळ्याकडे कोणत्याही राजकीय नेते अथवा पालिका प्रशासनाचे या पुतळ्याकडे लक्ष न वेधल्याने त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. आश्चर्याची बाब म्हणजे दिड ते दोन वर्षांपासून पुणे नगर मार्गासह पुलावरून रेल्वे मेट्रोचे काम सुरु असल्याने असणारा कामगार पुतळाच गायब झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत असल्याने याबाबत नागरिकांमध्ये शंका उपस्थित करण्यात येत आहे.

कारण कामगार पुतळ्यानजीकच एका राजकीय पक्षाच्या वतीने येरवडा-खडकी मार्गावर एका नेत्याचा हाताचा पुतळा उभारण्यात आला असतांना आजपर्यंत कोणी राजकीय नेत्यांनी अथवा पालिका अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई किंवा हस्तक्षेप केला नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण येरवडा उपनगर भागात प्रामुख्याने बहुतांश प्रमाणात कामगार वर्ग राहत असल्यामुळे व ऐतिहासिक वारसा म्हणून ह्या कामगार पुतळ्याकडे पाहिले जात असताना असणारा पुतळा हा काही राजकीय हेतूने की, अधिकाऱ्यांच्या दबावापुढे हटविण्यात आला आहे की काय ? अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हटविण्यात आलेला कामगार पुतळा कुठे ठेवण्यात आला आहे का ? त्याचे जतन करण्यात आले आहे का, याचा थांगपत्ता देखील कोणाला माहित नाही.

कारण या ठिकाणचा पुतळा कधी हटविण्यात आला आहे, याची माहिती देखील या भागातील नागरिकांना माहित नसून, इतिहासाची असणारी ओळख पुसण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. येरवड्याची ओळख म्हणून ज्या कामगार पुतळ्याकडे पाहिले जात होते त्या कष्टकरी कामगार पुतळ्याविषयी बोलण्यास ही राजकीय नेते धजावत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे हटविण्यात आलेला कामगार पुतळा गेला कुणीकडे ?हटविण्यात आला आहे. व त्याचे जतन कुठे केले आहे याची विचारणा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये