ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

बाळासाहेबांचे सर्वात जेष्ठ नातू जयदीप ठाकरे शिवसेना वाढीसाठी उतरणार मैदानात?

मुंबई : (Jaydeep Thackeray On Eknath Shinde) शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडला. यावेळी बाळासाहेबांचे जेष्ठ पुत्र जयदेव ठाकरे आणि पत्नी स्मिता यांच्यासोबत बिंदूमाधव यांचे पुत्र निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात स्टेजवर हजरी लावली. या तीन ठाकरेंनी शिंदेंच्या मेळाव्याला हजरी लावल्याने एक प्रकारे शिंदेंनी ‘ठाकरे’ कुटुंबातील सदस्य आपल्या बाजूने वळवल्याचे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, शिंदेंच्या मेळाव्याला हजेरी लावणाऱ्या जयदेव ठाकरेंचे आणि पहिल्या पत्नी जयश्री यांचे सुपुत्र, तर बाळासाहेबांचे सर्वात मोठे नातू जयदीप ठाकरे यांनी शिवसेनेच्या शिवाजी पार्क मैदानावर हजरी लावली होती. आज माध्यमांनी जयदीप ठाकरे यांची सविस्तर चर्चा केली त्यावेळी ते म्हणाले, “माझे आजोबा बाळासाहेब, उद्धव काका, आणि आदित्यबद्दल मला कायमच आदर वाटत आला आहे. शिवसेनेतील सध्याचं चित्र पाहता, मी माझ्या कुटुंबासोबत असणं हे माझं कर्तव्य समजतो. मी सध्या कला क्षेत्रात काम करत असून ती मला आजोबांकडून मिळाली आहे”.

पुढे बोलताना जयदीप म्हणाले, “सध्या शिवसेनेच्या पडत्या काळात उद्धव काकांना मला एखादी जबाबदारी सोपवावी वाटली, तर मी ती नक्कीच स्वीकारेन आणि पक्ष वाढवण्यासाठी नक्कीच हातभार लावेन, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. पुढे ते म्हणाले, मी रश्मी काकी, आदित्य यांच्या नेहमीच संपर्कात असतो. सध्या आदित्य खूप चांगलं काम करतोय, राज्यातील दौऱ्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असं जयदीप ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये