पुणेसिटी अपडेट्स

कीर्ती जाधव यांना नारीशक्ती पुरस्कार

पुणे : खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज ऑफ व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील इलेक्ट्रॉनिक टेक्नोलाॅजीच्या अध्यापिका सौ. कीर्ती शशिकांत जाधव यांना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणेचे वतीने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ नारीशक्ती पुरस्काराने एमआयटीच्या स्वाती चाटे व सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच त्यांचे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. यंदा विविध दिवाळी अंकात लेखन साहित्य प्रसिद्ध होत आहे. तसेच मराठी विषयातून पी.एच.डी.ही चालू आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कीर्ती जाधव यांच्या या शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी घेवून पुरस्कारासाठी निवड केली. कीर्ती जाधव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सुवर्णा निनाळे, प्रभारी मुख्याध्यापक विजयकुमार यादव यांनी अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये