Top 5क्राईमताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“आई, इथं गन पॉईंटवर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट लिहून घेतायत…” संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

मुंबईSanjay Raut’s Letter To Mother : शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अडीच महिन्यानंतर वेळ काढून आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहिलं आहे. मी अन्यायाच्या विरोधात लढत राहीन अशी ग्वाही त्यांनी या पत्रातून आपल्या आईला दिली आहे. अनेक तक्रारी देखील संजय राऊतांनी आपल्या आईकडे केल्या आहेत.

कथित पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत हे मागील अडीच महिन्यांपासून ईडी कोठडीत होते. काहीच दिवसांपूर्वी त्यांना ईडी कोठडीतून सुटका मिळाली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडीत त्यांना आईला पत्र लिहिण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा त्यांनी आईची आठवण येत असलेलं पत्र लिहून पाठवलं आहे.

पत्रात सुरुवातीलाच ज्या दिवशी संजय राऊतांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरून अटक केले त्या वेळची आठवण केली आहे. “माझ्यावर कोणी कितीही अन्याय केले तरी मी बाळासाहेबांशी बेईमानी करायची नाही.” असं म्हणत त्यांच्यावर अनेक खोटे आरोप लावले जात असून दहशद आणि दबाव टाकून अगदी गन पॉईंटवर खोट्या स्टेटमेंट घेतल्या जात असल्याचं संजय राऊतांनी पत्रात म्हटलंय.

उद्धव ठाकरे आणि असंख्य शिवसैनिक तुझी मुलं
संजय राऊतांनी पत्राच्या शेवटी “जशी तू माझी आई आहेस तशीच शिवसेना देखील माझी आई आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीत आईशी बेईमानी करू शकत नाही. चिंता नसावी मी येईलच. तोपर्यंत उद्धव ठाकरे आणि असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे.” अशा भावनिक शब्दांत समारोप केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये