महाराष्ट्रसिटी अपडेट्स

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांवर संकट

वर्धा : गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने जोर धरला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी दमदार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. परतीच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. मागील तीन दिवस वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार परतीचा पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून असल्याने काढणीला आलेले पीक खराब होऊ लागले आहेत. २०२२ हे वर्ष शेतकऱ्यांना त्रासदायक ठरले असून, अशी अतिवृष्टी पुन्हा होऊ नये, अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.जिल्ह्यात जवळजवळ आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे आणि देवळी तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे.

शेतकऱ्यावर संकट..
देवळी तालुक्यातील टाकळी धरणे सह अनेक गावांमध्ये शेतात सोयाबीन आणि कपाशीचे पीक उभे आहे. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीतून हे पीक कसेतरी वाचले होते. आता शेतकऱ्यांना शेतात जाणे देखील कठीण झाले. एवढेच नाही तर जमीन प्रचंड ओली असल्याने काढणी अशक्य झाली आहे.

त्यामुळे मागील तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसाने पुन्हा सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे नुकताच अतिवृष्टीतून सावरत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला. पावसाचा जवळपास अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. अतिवृष्टीतून बचावलेल्या सोयाबीन व कापसाच्या पिकाची परतीच्या पावसाने पूर्णपणे नासाडी झाली आहे. असे चित्र काही गावातील शेतात दिसत आहे. पिकांची अतिशय दयनीय अवस्था असून, अनेक गावातील शेतात नुकसान झाले. अडगावातून जाणाऱ्या विद्रुपा नदीला पुराचे पाणी कल्व्हर्टवरुन वाहून गेल्याने पूर आल्याने शेतीचे नुकसान झाले. त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये