ताज्या बातम्यारणधुमाळी

“शिवसेनेतला प्रत्येक शिवसैनिक माझ्या बाळाचा मामा…”, धमकी प्रकरणावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

मुंबई | Sushma Andhare – उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्ता सुषमा अंधारे (Sushma Andhare) या त्यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर चांगल्याच चर्चेत आहेत. आता देखील त्या चर्चेत आल्या असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा पुरवली असून कुटूंबात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सुषमा अंधारेंना धोका असल्याचं कळताच त्यांच्या आईंनी पदरातील बाळाचं काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच “या परिस्थितीशी मी लढायचं ठरवलं आहे. मग माझ्या बाळाचं काय? तर शिवसेना काळजी घेईल. शिवसेनेतला प्रत्येक शिवसैनिक माझ्या बाळाचा मामा आहे”, असं अंधारे आपल्या आईला उद्देशून म्हणाल्या आहेत. याच दरम्यान, या धमकीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अंधारेंची विचारपूस देखील केली आहे.

“पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीविरोधातील आंदोलनात गुरूवारी सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर इमारतीपासून प्रवेशद्वारापर्यंत जात असताना माझ्या गाडीत काही पोलीस कर्मचारी येऊन बसले. तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो”, असं त्यांनी सांगितल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. पोलिसांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारे मुंबई आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी करणार आहेत.

दरम्यान, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) हल्लाबोल केला. सुषमा अंधारे काल (13 ऑक्टोबर) नवी मुंबईमधील महाप्रबोधन यात्रेदरम्यान झालेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, “काय काय बोलतील पत्ताच लागत नाही. आम्ही आमच्या आयुष्यात असं कधी पाहिलं नाही. काय काय पाहायला मिळतंय आम्हाला आज. माझा भाऊ मुख्यमंत्री आहे. मला वाईट वाटतं आहो. मला नाही चालत माझ्या भावाचा असा अपमान केलेला. वाईट वाटतं मला. माझ्या भावाच्या समोरचा माईक ते काढून घेतात. बोलायला लागले की कागद देतात. का माझ्या भावाला येत नाही काही? माझा भाऊ ढ वाटतो का तुम्हाला? माझा भाऊ काॅप्या करून पास झालाय का?”, असा मिश्कील प्रश्न अंधारे यांनी विचारला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये