ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रशेत -शिवार

अतिवृष्टी अख्ख्या मराठवाड्यात अन् पंचनामे फक्त परभणीत!

औरंगाबाद : (Farmers loss in Marathwada due to rain) मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. डोळ्यासमोर उभं पिक पावसात वाहून जाताना आणि मातीमोल होताना पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे अश्रू या राज्यकर्त्यांना कधिच दिसणार नाहीत का? पाऊस ओसारल्यावर बांधावरुन फोटो काढणारे नेते मंडळी शेतकऱ्यांच्या मतदानावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतात. मात्र, संकट काळात शेतकऱ्यांचा वाली म्हणून कोणीच समोर येताना दिसत नाही. या धो-धो पडणाऱ्या परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस, फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामध्ये लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ पीक विमा, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांचे काढणीला आलेले आणि काढून ठेवलेले सोयाबीन पाण्यात मिळाले आहे.

मात्र, आज परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे कोणाला दिसले का? असे विचारण्याची वेळी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. सावे यांनी लवकर पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांनी आर्थिक मदत करावी ही अपेक्षा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये