शिंदे सरकारचा निर्णय! विरोधी पक्षांतील बड्या नेत्यांची सुरक्षा हटवली

मुंबई (CHANGES IN VIP LEADERS SECURITY) : शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांची व्हीआयपी सुरक्षा काढून घेतली आहे. काही दिवसांपूर्वी या सुरक्षेसंबंधित पोलीस अधिकाऱ्यांची एक रिव्ह्यू बैठक घेण्यात आली होती. त्यात कोणत्या नेत्याला किती सुरक्षा द्यायची, कोणत्या नेत्याची सुरक्षा कमी किंवा जास्त करायची याबाबद निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत.
तुरुंगात असलेले नवाब मलिक, संजय राऊत, अनिल देशमुख यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील विजय वडट्टीवार, सतेज पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अरुण सरदेसाई यांची सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, जितेंद्र आव्हाड, ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाची सुरक्षा कायम ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. तर मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या निर्णयावर राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटतील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.