पुणेरणधुमाळी

शिवसेना शिंदे गटाच्या प्रसिद्धिप्रमुखपदी संजय अगरवाल

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : सामाजिक कार्यकर्ते संजय अगरवाल यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धिप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले आणि पुणे शहरप्रमुख, माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी संजय अगरवाल यांची नियुक्ती केली अाहे.

नुकतेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अगरवाल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्ष वाढीच्या कार्यात अगरवाल जबाबदारीने पद सांभाळतील, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला. पुणे शहराच्या राजकारण आणि समाजकारणात संजय अगरवाल गेली तीस वर्षे कार्यरत आहेत.

व्यापार, शिक्षणक्षेत्र यातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष यांचे कार्य, धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. नेत्यांच्या विश्वासास मी पात्र ठरेन, असे मनोगत संजय अगरवाल यांनी व्यक्त
केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये