“हनुमान चालिसा म्हणता येत नाही तरी, …” बच्चु कडूंचा राणा दाम्पत्यावर निशाण!

अमरावती : (Bachhu Kadu On Ravi Rana) चार महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी करत, नवं सरकार स्थापन केलं. त्यांना जवळपास 10 अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. बंडखोरीनंतर विरोधकांकडून ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, बडनेराचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राणी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी याच मुद्द्यावरुन अचलपूरचे आमदार कच्चु कडू यांना डिवचल्याने सरकारमधील दोन आमदारांमध्ये वाद जुंपला असल्याचे महाराष्ट्राने पहिलं आहे. बच्चु कडू तोडपाण करणारा आणि पन्नास खोके घेणारा आमदार असल्याचे भरसभेत हल्ला राणा दाम्पत्यांनी केला आहे.
यावर कडू म्हणाले, फुकटची प्रसिद्ध म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. हनुमान चालीसा म्हणता येत नाही. तरी चालले तिकडं हनुमान चालीसा म्हणायला. अशावेळी हनुमानने गदा मारली मागून तर समजेल यांना, असं म्हणत त्यांनी रवी राणा यांना टोला लगावला आहे.
राणा-कडू यांच्यातील वाद आता थेट मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीने मिटवला जाणार आहे. मात्र, त्यापुर्वी हा वाद कमी होण्याचे नाव घेताना दिसत नसल्याचे बच्चू कडू यांच्या वक्तव्याने दिसून येत आहे. कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’, कोणत्याही नेत्याचे नाव न घेता त्यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांच हे विधान चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.