Top 5आरोग्यताज्या बातम्यादेश - विदेश

बॉयकॉट कॅडबरी ट्रेंडमागे दिवाळीची जाहिरात आणि नरेंद्र मोदींचा संबंध

CADBURY : आजकाल कोणतीही गोष्ट बॉयकॉट म्हणायला जास्त वेळ लागत नाही. चित्रपटांपासून जाहिरातींपर्यंत लोक बॉयकॉट कारणासाठी मागणी करतात. सोशल मीडियावर दररोज काही न काही बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करताना दिसतात. सध्या ट्वीटर वर बॉयकॉट कॅडबरी असा ट्रेंड सुरु आहे. अनेकजण कॅडबरीमध्ये गोमांस वापरल्याचा आरोप करत आहेत तर काही जणांकडून वेगळ्याच कारणांसाठी कॅडबरीला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे.

मागच्या वर्षी देखील लोकांनी बॉयकॉट कॅडबरी म्हणत ट्रेंड आणला होता. त्यावेळी कंपनीकडून कॅडबरी पूर्णपणे शाकाहारी असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आजूनही अनेकजण कॅडबरीत मांस असल्याचे पुरावे देत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर आज सुरु असलेल्या ट्रेंडमागे दिवाळीतील कॅडबरीची जाहिरात कारणीभूत आहे. ज्यामध्ये एका दिवे विकणाऱ्या स्थानिक दुकानदाराचं दुकान ऑनलाईन शॉपिंग साठी एका डॉक्टरकडून उपलब्ध करून दिलं जातं.

विश्व हिंदू परिषदेच्या महिला नेता डॉ. प्राची साध्वी यांनी कॅडबरीची दिवाळीतील जाहिरात ट्वीट करून तिचा संबंध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला आहे. या जाहिरातीत दिवा विकणाऱ्या गृहस्थाचे नाव दामोदर दाखवल्याने बऱ्याच लोकांनी यावर आपत्ती दर्शवली आहे. साध्वी आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, “तुम्ही कॅडबरीची नवी जाहिरात काळजीपूर्वक पाहिली आहे का? या दिवा विकणाऱ्या व्यक्तीचे नाव दामोदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नावही दामोदरच आहे, आणि यातून अयोग्य चित्रण केल्याचं समोर आलं आहे. चहावाल्याचे वडील दिवेवाले असं दाखवताना कॅडबरीला कंपनीला लाज वाटत नाही?”

सध्या सोशल मीडीयावर या कारणामुळेच अनेकांकडून बॉयकॉट कॅडबरीचा ट्रेंड चालवला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये