
पुणे : ‘हाऊसहोल्ड’ प्रकारात बचत वाढल्यामुळे भारतीय कुटुंब त्यांना काही अकस्मात खर्च करण्याची वेळ आली, तर तो करू शकतात. सेवानिवृत्तीनंतर याचा फायदा होऊ शकतो. मुलांची शिक्षणे, मुलींचे लग्न यासाठी बचत उपयोगी ठरू शकते. भारतीय काही रक्कम रोखीत ठेवणे पसंत करतात, नाहीतर बँकांच्या मुदतठेवी, ‘म्युच्युअल फंडा’च्या योजना, विमा, सेवानिवृत्तीनंतरच्या निधी योजना, तसेच सोने व ‘रिअल इस्टेट’ यात गुंतवणूक करतात.
मार्च २०२२ अखेर गृहकर्ज ढोबळ वित्तीय बचतीचे प्रमाण ‘जीडीपी’च्या दहा टक्के होते. यात अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १६ टक्के घट झाली. कोरोनात जीवन बंदिस्त असल्यामुळे काही प्रमाणात कमी झालेले खर्च तसेच गरज म्हणून केलेली बचत यामुळे २०२०-२१ वर्षात या बचतीचे प्रमाण वर सरकले होते. २०२२-२३ मध्ये हे प्रमाण ‘जीडीपी’च्या किमान १२ टक्क्यांपर्यंत जाईल, असा या क्षेत्रातील जाणकारांनी अंदाज वर्तविला आहे.
डिजिटल ऍक्सेसमध्ये वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडांबद्दल वाढत्या जागरूकतेमुळे, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यांत जवळपास ७० लाख गुंतवणूकदार खाती जोडली आहेत. त्यामुळे हे प्रमाण १३.६५ कोटींवर पोहोचले. २०२२ मध्ये ३.१७ कोटी गुंतवणूकदार खाती, २०२०-२१ मध्ये ८१ लाख खाती (किंवा म्युच्युअल फंड भाषेतील फोलिओ) जोडल्यानंतर हे आले, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या डेटाने दर्शविले आहे.
उद्योगाने मे 2021 मध्ये 10 कोटी फोलिओचा टप्पा ओलांडला. कोविड नंतर, भारतीय इक्विटी मार्केटमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढले आहे.
सचिन महाले, एएमएफ रजिर्स्टड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर
सध्या सार्वत्रिक महागाई वाढली असल्यामुळे खर्चाचे प्रमाणही बरेच वाढले असून परिणामी बचतीला खिळ बसत आहे. जागतिक बचत दिनानिमित्त घेतलेल्या आढाव्या नुसार बचत ही जीवनरक्षक आहे, कारण ती अचानक आलेल्या दुर्दैवी परिस्थितींवर मात करण्यास मदत करते. जीवनातल्या वाईट दिवसांशी सामना करण्यासाठी बचत करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी बचत करण्याची सवय लावून घेण्याची आवश्यकता आहे. भारतातली बचतीची टक्केवारी दिवसेंदिवस घटत आहे. विशेषतः कोरोनाच्या संकटानंतर हे प्रमाण कमी तर झालेच आहे त्याच बरोबर बचतीचा ट्रेंड देखील बदलतो आहे.