“त्यावेळी मला त्याच्या बॅगमध्ये…”, सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेनच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

मुंबई | Charu Asopa – बाॅलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचा (Sushamita Sen) भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. तसंच गणेश चतुर्थीच्या वेळी या दोघांनी मुलीसाठी पुन्हा एकत्र येत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा राजीव आणि चारू यांच्यात वाद झाल्याने त्या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान, चारू आसोपानं पती राजीव सेनबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
चारू आसोपानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पती राजीवबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी चारू म्हणाली, “बीकानेरमध्ये काही महिने राहिल्यानंतर मी मुंबईला परतले होते. गरोदर असताना मी सर्वाधिक वेळ मुंबईतच घालवला. त्यावेळी राजीव वांद्रे जिमसाठी म्हणून सकाळी 11 वाजता निघून जायचा आणि रात्री उशीरा 11 वाजता घरी यायचा. कधी तो 7, 8 किंवा 9 वाजताही घरी यायचा. जेव्हा मी त्याला एकदा विचारलं की एवढा उशीर का होतो. तेव्हा तो मला म्हणाला होता की, मी सर्वात आधी मॅपवर ट्राफिक पाहतो आणि मग एका कॅफेमध्ये कॉफी पितो आणि ट्राफिक कमी होण्याची वाट पाहतो. त्यानंतर मी घरी येण्यासाठी निघतो. त्यावेळी मी राजीववर विश्वास ठेवला होता.”
“राजीव मला अनेकदा सांगायचा की तो कारमध्ये झोपतो किंवा मग त्याची अन्य काही ना काही कारणं असायची. एकदा तर तो मला काहीच न सांगता दिल्लीला निघून गेला होता. त्यावेळी मी त्याचं सामान व्यवस्थित ठेवत होते. तेव्हा मला त्याच्या बॅगमध्ये असं काही सापडलं ज्यामुळे मला तो माझी फसवणूक करत असल्याची खात्री झाली. मी संपूर्ण कुटुंबाला यासंदर्भात माहिती दिली. तसंच जेव्हाही असं काही व्हायचं तेव्हा मी विचार करायचे की मी इथून निघून जाईन. पण माझं त्याच्यावर प्रेम होतं. त्यामुळे मी सर्व गोष्टी विसरून पुढे जायचा प्रयत्न करायचे. माझ्या वैवाहिक आयुष्यातली साडेतीन वर्षे आयुष्याची नवी सुरूवात करण्यातच गेली”, असंही चारूनं सांगितलं.