ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“दोघेही गुन्हेगारच राज्य महिला आयोगाने…”; सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप!

मुंबई : (Sushama Andhare On Rupali Chakankar) राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाची नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या विरोधात अर्वाच्य भाषा वापरली तरी राज्य महिला आयोगाकडून त्यावर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. रुपाली चाकणकरांना आपण या बाबतीत दोन वेळा फोन केला पण, त्यांनी तो उचलला नाही. जी कारवाई सुप्रिया सुळे यांच्या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आली ती कारवाई आपल्या प्रकरणात गुलाबराव पाटील यांच्यावर का करण्यात आली नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

अंधारे म्हणाल्या की, “मी महिला आयोगावर टिका करत नाही, तर महिला आयोगाच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छिते की त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई करावी. जर अब्दुल सत्तार यांना तुम्ही आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नोटीस बजावता तर गुलाब पाटील यांना नोटीस का बजावत नाही. दोघेही गुन्हेगारच आहेत. राज्य महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये.

फक्त अब्दुल सत्तार यांना नोटीसा काढू नये.” काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी असा केला होता. यामुळे राज्यभरातील सर्व महिलांचा अपमान झाला असून मंत्र्यांनी महिलांबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे निषेधार्ह बाब आहे. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटातर्फे जळगावात मोर्चा काढण्यात आला होता. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये