महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाला! काय म्हणाले अमित शाह?

नवी दिल्ली : (Maharashtra Karanataka Border Dispute) महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर शेवटी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या समक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर कर्नाटकाचे मुख्यामंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक पार पडली. (amit shah on maharashtra karnataka border dispute eknath shinde devednra fadanvis basavraj bommai)
काय म्हणाले गृहमंत्री अमित शाह?
१) जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणतेही राज्य सिमाप्रश्नाबद्दल वाद करणार नाही.
२) दोन्ही राज्याचे मिळून तीन तीन मंत्री यावर खोलवर ते चर्चा करतील. इतर सीमाप्रश्नांवर देखील हे लोक चर्चा करून मार्क काढतील.
३) यापुढे कोणत्याही नागरिकाला वादग्रस्त भागात कसलाही त्रास होणार नाही यासाठी दोन्ही राज्यांत एकेका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्ये कमिटी स्थापन करतील.
4) या प्रश्नावर वाद घालून तोडगा निघणार नाही. घटनात्मक पद्धतीनेच यावर तोडगा निघेल.
5) खोट्या ट्विटर अकाऊंट मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. एका खोट्या ट्वीटमुळे प्रकरण वाढले आहे.
6) दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सामंजस्य साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी सदर प्रकरणावर तात्पुरता पर्याय काढून वाद थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याचा पुढील काळात काय फरक पडेल याबाबत शंका आहे. कारण महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा गेली अनेक वर्षापासुन सुरूच आहे.