क्राईमताज्या बातम्या

खळबळ जनक : पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार

पुणे | पुण्यात आज पुन्हा खळबळ जनक घटना घडली आहे. पुण्याचे मनसे (MNS) जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale) यांच्या राजगुरुनगरच्या राहत्या घरासमोर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. मागील अनेक वर्षांपासून समीर थिगळे मनसेत कार्यरत आहेत. कुख्यात गुंडानी हा गोळीबार केला असल्याचे समजले आहे. कुटुंबीयांसमोरच गोळीबार केल्याने कुटुंबात आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सखोल तपास सुरु करत आहेत. 

त्यावेळी नक्की काय घडलं ?

गुंडानी समीर यांना पैशाची मागणी केली आणि त्यांना धमकी देखील दिली. “मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय संपवतोच तुला”, असं म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर या गुंडांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीवर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे. 

यावेळी दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी हवेत गोळीबार केला, मात्र पिस्तुलातून गोळी सुटलीच नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी समीर थिगळे यांचं कुटुंब घटनास्थळी हजर होतं. गुंडानी त्यांंच्यासमोरच समीर यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या सगळ्या घटनेत मात्र कोणालाही इजा झाली नाही. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये