ताज्या बातम्यामनोरंजन

मातृशोक झाल्यानंतर राखी सावंतची पहिली भावूक पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री राखी सावंतची (Rakhi Sawant) आई जया भेडा यांचे निधन झाल्याचे वृत्त 28 जानेवारी रोजी समोर आले. मल्टि ऑर्गन फेल्युअरमुळे राखीच्या आईचे निधन झाले. जया या ब्रेन ट्युमरचा सामना करत होत्या. त्यांना किडनी आणि फुप्फुसांसंर्भातील तक्रारीदेखील होत्या. त्यांच्या अशा अचानक जाण्याने राखी सावंतला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा हॉस्पिटल मधील व्हिडीओ राखी सावंतने (Rakhi Sawant) शेअर केला आहे. काळीज पिळवटून टाकणारा हा अंतिम क्षणातील व्हिडीओ आहे.

जया या रुग्णालयात बेडवर झोपलेल्या दिसून येत आहेत. त्यांना श्वास घेताना त्रास होत असल्याचं या व्हिडीओतून दिसतंय. तर राखी आईच्या बेडजवळ जमिनीवर बसून हमसून हमसून रडताना दिसत आहे. रडत रडतच आईला बरे वाटावे म्हणून देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे. आईला वाचवण्यासाठी राखीने जंग जंग पछाडले. आईच्या आजारपणाला पैसा कमी पडू नये म्हणून राखी बिग बॉसच्या शोमध्येही गेली होती. पाण्यासारखा पैसा ओतला. उत्तमोत्तम उपचार दिले. एवढंच काय तिने आईसाठी लग्नही केलं होतं.

पुढे पोस्टमध्ये ती म्हणते, आज माझ्या डोक्यावरून मायेचा हात गेला. आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नाही. आय लव्ह यू आई… आई, तुझ्याशिवाय काहीच नाही. आता माझा आवाज कोण ऐकेल. कोण मला हृदयाला बिलगून धरेल. आता मी काय करू आई? मी कुठे जाऊ?; अशी भावनिक पोस्ट राखीने लिहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये