‘आज’ नाही तर ‘या’ दिवशी पार पडणार सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाह सोहळा

Sidharth-Kiara Wedding | अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सिद्धार्थ-कियाराचा विवाह सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. हा शाही विवाह सोहळा 6 फेब्रुवारी रोजी पार पडणार असल्याची चर्चा सगळीकडे होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार हा विवाह सोहळा 6 तारखेला नसून 7 तारखेला संपन्न होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे.


रविवारी कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला 100 ते 125 पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय.

जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी 84 आलिशान रुम्स बुक करण्यात आले आहेत. तर लग्नाला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची ये-जा करण्यासाठी 80 गाड्यांचीही सुविधा करण्यात आली आहे.

कियारा आणि सिद्धार्थच्या संगीत आणि हळदीचा कार्यक्रम आज (6 फेब्रुवारी) पार पडणार आहे. तर 7 फेब्रुवारी रोजी लग्न आणि रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.