क्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

लता दीदींच्या आठवणीत सचिन तेंडुलकरची भावूक पोस्ट

मुंबई | आज भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा पहिला स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. टीम इंडियाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) लता दीदींच्या आठवणीत एक भावूक पोस्ट लिहित लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. सचिनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लता मंगेशकर आणि सचिन या दोघांचं आई-मुलासारखं नातं होतं. जेव्हा लता दीदी कायमच्या निघून गेल्या, तेव्हाही सचिन भावूक झाला होता.

सचिनने केलेली पोस्ट काय आहे?

सचिनने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लता मंगेशकर यांच्या गाण्यातील काही ओळी शेअर केल्या आहेत. “तुम्हाला जाऊन एक वर्ष झालं लता दीदी, पण तुमची सावली कायम सोबतच राहिल”, असं भावनिक ट्विट सचिनने केलं आहे.

लता दीदी आणि सचिन या दोघांमध्ये रक्तापलीकडे असलेलं नातं हे जगजाहीर होतं. सचिन लता दीदी यांना आई मानायचा. सचिनने याची कबूली एका जाहीर कार्यक्रमात दिली होती. त्याचप्रमाणे “सचिन मला आईसारखा समजतो. मी सुद्धा त्याच्यासाठी आईप्रमाणेच प्रार्थना करते. मी तो दिवस कधीही विसरु शकत नाही, जेव्हा सचिनने मला आई म्हणून हाक मारली होती. मी कल्पना सुद्ध करु शकत नाही. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला सचिनसारखा मुलगा भेटला”, असं लता दीदी यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये