हिंडेनबर्गचा सर्जिकल स्ट्राइक सुरुच! अदानी समुहाला पुन्हा मोठा धक्का

(Gautam Adani In Hindenburg) मागील काही दिवसांपासून अदानी समूह माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे अदानी यांची दिवसेंदिवस होत असलेली उद्योगिक घसरण. अमेरिकन संशोधन संस्था हिंडेनबर्गच्या अहवालाचे धक्के आजही अदानी समूहाला बसत आहेत. आजही अदानी समूहाचे ४ शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत तर गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत २२ व्या क्रमांकावर गेले आहेत. अदानी यांची वेगात झालेली प्रगती हिंडेनबर्गमुळे वेगात खाली आहे.
अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीतही त्याच दराने घट होत आहे. याचा परिणाम जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत दिसून येत आहे. जिथे २०२३ च्या सुरुवातीला गौतम अदानी टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या स्थानावर दबदबा निर्माण करत होते, तिथे आता काही दिवसातच त्यांची या यादीत २२ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. फोर्बच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार आज गौतम अदानींची नेट वर्थ ५८.४ बिलियन डॉलर झाली आहे.
अदानी यांच्या कमाईत देखील मोठी घट होत आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये कमाईच्या बाबतीत त्यांनी जगातील सर्व श्रीमंत लोकांना मागे टाकले होते. २०२२ मध्ये त्यांनी एका वर्षात जेवढे कमावले होते त्यापेक्षा जास्त त्यांनी १३ दिवसांत गमावले आहे. अदानींच्या कंपन्यांच्या समभागांच्या सततच्या घसरणीमुळे आता अदानी समूहाचे मार्केट कॅप निम्म्यावर आले आहे. त्यामुळे हा अदानी समूहासाठी मोठा धक्का मानला जात आहे.