भूकंपात बहिणीच्या प्रेमाची मिसाल देणारी घटना; पाहा चिमुकल्यांचा व्हायरल व्हिडीओ

Turkey Syria Earthqueak : तुर्कस्तान आणि सिरीया (TurkeySyriaEarthqueak) देश कालपासून अनेक भूकंपाच्या धक्क्यांनी संकटात सापडले आहेत. सध्या भूकंपात मृत्यू झालेल्यांची संख्या ५००० पेक्षा जास्त सांगितली जात आहे. अजूनही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेकांचे शव सापडत असल्याची माहिती आहे. मृत्यूचे तांडव याठिकाणी दिसत आहे. अशातच अनेक गहिवरून आणणारी तर काही अभिमानाचे अश्रू आणणारी दृश्ये भूकंप स्थितीतून समोर येत आहेत. (Turkey Syria Earthqueak)
भूकंपात सापडलेल्या एका चिमुकल्या बहिण भावांचा व्हिडीओ जगभर व्हायरल होत आहे. ज्यात एक चिमुकली बहिण आपल्या लहान भावाला सांभाळताना दिसत आहे. दोघेही पडलेल्या इमारतीच्या भिंतीखाली दबलेले दिसत आहेत. बचावकर्त्यांनी त्यांना बाहेर काढले आहे. या बहिण भावांचा व्हिडीओ जगभर व्हायरल होत आहे. एक मोठी बहिण आपल्या लहान भावाची संकटकाळातही किती काळजी घेत असते याचं उत्तम उदाहरण ही घटना बनली आहे. (Turkey Syria Earthqueak India Helps)
तुर्कस्तान आणि सिरीयामध्ये काल (सोमवारी) तब्बल ७.८ मॅग्निट्युडच्या भूकंपाचे अनेक हादरे बसले. ज्यामुळे शेकडो इमारती कोसळल्या आहेत. ५००० हून अधिक मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आणखी या संख्येत वाढ होण्याची शक्यता दर्शविण्यात येत आहे. दरम्यान, जगभरातील इतर देशांकडून तुर्कस्तान आणि सिरीयाला मदत केली जात आहे. तुर्कस्तानमध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित करण्यात आला आहे.