“अगं बाई वेड लागलं की काय?” जान्हवी कपूरच्या अजब डान्स, स्टेप्स ट्रोलर्सच्या निशाण्यावर..

(Janhvi Kapoor Dance Video) : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमीच आपल्याला (Janhvi Kapoor dance performance) सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते. ती आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ तसंच रील शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. जान्हवी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत चांगल्या आणि निवडक भूमिका करताना दिसली. ती अनेकदा मजा-मस्तीवाले व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते.
नुकताच जान्हवीनं उदयपुरमध्ये एक स्टेज शो केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. पण यामध्ये जान्हवीने अजब डान्स केल्यामुळे तिला ट्रोलही केलं जात आहे. ‘मिली’ अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकताच उदयपुरमध्ये एक डान्स परफॉर्मन्स दिला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. जान्हवीला तिच्या डान्स स्टेप्ससाठी खूप ट्रोल केलं गेलं आहे.
डान्स करताना अनेकदा जान्हवीच्या स्टेप्स इंटरनेटवर लोकांच्या टीकेला सामोऱ्या जाताना दिसत आहेत. तसं पाहिलं तर त्या व्हिडीओत जान्हवी कपूर फ्रिंज आणि सेक्विनच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिनं व्हिडीओत अनोख्या डान्स स्टेप्स दाखवल्या आहेत. या व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.