ताज्या बातम्या

गाईला नेमकी मिठी कशी मारायची ? कुठून मारायची ?; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला उपरोधिक टोला

मुंबई | केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने येत्या 14 फेब्रुवारी रोजी काऊ हग डे (Cow Hug Day) साजरा करा हे फर्मान काढलं आहे. या दिवशी गायींना अलिंगन द्या. तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारवर टीका होत आहे. राजकारण्यांकडून तर केंद्रावर टीका केली जात आहेच, पण नेटकरीही मिम्सच्या माध्यमातून सरकारच्या या निर्णयाची खिल्ली उडवताना दिसत आहे. हे सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यात उडी घेतली आहे. गायीला मिठी कशी मारायची? कुठून मारायची? अस खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) हा दिवस प्रेमाचं प्रतिक आहे. व्हॅलेंटाईन डेला अनेक वर्षाची परंपरा. भारतातलं त्याचं स्वरूप बदलत गेलं आहे. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस आहे, त्यामध्ये आईसुद्धा प्रेमाचं प्रतिक असू शकते. गाईवर प्रेम करा, त्याला हरकत नाही. पण गायी आणायच्या कुठून ? शासनाकडून गायी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत का ? असा खोचक सवाल त्यांनी केला.

गाईला नेमकी मिठी कशी मारायची ? पुढून मारली तर शिंग मारणार नाही. मागून मिठी मारली तर लाथ मारणार नाही ना ? गायीचे पोट खूप मोठे असते. एवढ्या मोठ्या पोटाला मिठी कशी मारणार ? मिठी मारायची कशी हे सरकार दाखवणार का ? गायीला मिठी कशी मारायची याचं प्रात्यक्षिक सरकारने 24 तास आधी टीव्हीवर दाखवावं. तरुणांना गायी उपलब्ध करून द्याव्यात, असा असाही त्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये