ताज्या बातम्या

देशात सापडला मोठा खजिना; जम्मू-काश्मीरमध्ये आढळला लिथियमचा साठा

जम्मू-काश्मीर | देशात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा मोठा साठा आढळून आला आहे. लिथियमचा साठा आढळून आलेला हा पहिलाच प्रदेश आहे. इलेक्ट्रिक वाहनं आणि मोबाइल फोनसारख्या उपकरांमध्ये जी बॅटरी वापरील जाते यात लिथियमचा वापर केला जातो. सध्या भारताला लिथियम इतर देशांकडून आयात करावं लागतं. जम्मू- काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात आढळलेल्या साठ्यामुळे आता देशाचे आयातीवरील अवलंबीत्व कमी होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आढळून आलेला हा लिथियम जो भारताचं नशीब बदलू शकतो. जगभरातल्या अर्थव्यवस्थेत भारताची ताकद वाढवू शकतो. केंद्र सरकारने सांगितलं की, जम्मू काश्मीरमध्ये 5.9 लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे, जो भारतातल्या वाहतूक व्यवसायला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा साठा सापडला आहे. देशात याचे एकूण 51 ब्लॉक सापडले आहे. यापैकी 5 ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. ही खनिज संपत्ती 11 राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात आढळून आली आहे. या राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर (यूटी), आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामीळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे”, अशी माहिती खणीकर्म मंत्रालयानं दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये