क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारत मजबूत स्थितीत! हिटमॅन शर्माचं शतक, तर दोन डावखुऱ्यांची दमदार नाबाद अर्धशतक खेळी..

नागपूर : (IND vs AUS 1st Test Day 2) पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला डाव 1 बाद 77 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. काल शुन्यावर खेळत असलेल्या अश्विनने आज आपले खाते उघडले. त्याने रोहित शर्माच्या साथीने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी भारताचे शतक धावफलकावर लावले. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फीने भारताला दोन धक्के दिले. त्याने 23 धावा करून सेट होऊ पाहणाऱ्या आर अश्विनला बाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला देखली 6 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.

लंचपर्यंत विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्माला साथ दिली. मात्र त्यानंतर टॉड मर्फीने भारताची चौथी शिकार करत विराटला 12 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला. आवघ्या 8 धावांवर सुर्या माघारी फिरला. त्यानंतर कर्णधार रोहितने आपले शतक पूर्ण करत भारताला 200 चा टप्पा पार करून दिला. पॅट कमिन्सने नवीन चेंडूवर रोहितचा उत्कृष्ट आऊट स्विंगवर 120 धावांवर खेळत असताना, त्रिफळा उडवला आणि भारताला मोठा धक्का दिला. दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फलंदाजीस आलेल्या केएस भरतला बाद करून टॉड मर्फीने पदार्पणाच्याच सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. भरतने केवळ 8 धावा केल्या.

मात्र, त्यानंतरच्या रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल जोडीने दमदार अर्धशतके झळकावली. हे दोन्ही फलंदाज सध्या नाबाद आहेत. पटेलने 52, तर जडेजाने 66 धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी भागीदारी करत भारताला पुन्हा एकदा मजबूत स्थितीत आणले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 144 धावांची आघाडी घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये