ताज्या बातम्यापिंपरी चिंचवडरणधुमाळी

शिवसेनेची शिष्टाईही निष्फळ! कलाटेंची उमेदवारी कायम; चिंचवडमध्ये रंगणार तिरंगी लढत..

चिंचवड : (Uddhav Thackeray On Rahul kalate) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा अर्ज कायम राहिला. त्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॅांग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन आहेर आज सकाळी कलाटेंना वाकड येथील त्यांच्या कार्यालयात भेटले. बंद दाराआड चर्चा करताना उध्दव ठाकरे यांचे मोबाईलवरून कलाटेंशी बोलने झाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॅांग्रंसचे स्थानिक नेते योगेश बहल व मोरेश्वर भोंडवे यांनी कलाटे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे कलाटे यांच्या कार्यालयाजवळ आले होते. त्यांनीही शेवटचा शिष्टाईचा प्रयत्न केला. पण, ही शिष्टाईही असफल ठरली. अखेर तीन वाजता पत्रकारांसमोर येऊन कलाटे यांनी आपण निवडणुक लढवित असल्याचे जाहिर केले.

उध्दव ठाकरे, अजित पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. कार्यकर्यांचा रेटा व जनतेची लोकभावना, जनतेचा मला असलेला पाठींबा याचा आदर करत मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. नुरा कुस्ती होऊ नये म्हणून मी लढत आहे. माझी उमेदवारी कापल्यामुळे मलाच सहानुभूती आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये