ताज्या बातम्यामनोरंजन

मराठमोळ्या शिव ठाकरेचं बिग बॉसकडून कौतुक; म्हणाले ‘तू मराठा माणसासारखा…’

Bigg Boss 16 : बिग बॉस 16 अगदी अंतिम टप्प्यात आहे. बिग बॉस 16 ची ट्रॉफी कोण घेऊन जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बिग बॉस च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये बिग बॉसने शिव ठाकरे याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. घरातील दरमदार स्पर्धकांपैकी एक स्पर्धक म्हणून शिव ठाकरे (Shiv Thakare) याची ओळख आहे. शिवचं बिग बॉससोबतच सलमान खानने (Salman Khan) देखील कौतुक केलं आहे.

शिव ठाकरेची एव्ही दाखवत बिग बॉस (Bigg Boss) म्हणाले, शिव ठाकरे एकमेव स्पर्धक आहे, जो दोन बिग बॉस सीझनच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. पुढे बिग बॉस म्हणाले, ‘काही लोकं मनाने खेळतात, तर काही विचार करुन डोक्याने खेळतात, पण शिव एकच असा स्पर्धक आहे जो मनाने आणि विचार करुन खेळतो. याठिकाणी अनेक लोकं होती पण त्यांना चालवणारा शिव ठाकरे होता. मराठा ऐकल्यावर त्यांची वीरता आठवते. वीर मराठ्यांप्रमाणे शिव कोणालाही न घाबरता योग्य प्रकारे चौकटीत खेळला.’ असही बिग बॉस म्हणाले.

बिग बॉस 16 मधील शिवच्या प्रवासाची एक झलक दाखवल्यानंतर उपस्थित असलेले प्रेक्षक जोर-जोरात घोषणा देऊ लागले. त्यानंतर शिव म्हणाला, ‘बिग बॉस तुम्ही सिनेमाच तयार केला आणि मला हिरो केलं.’ आनंदामध्ये शिवने अनेकदा मंचावर डोक टेकवत आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये