चिंचवडमधील शिवसैनिकाने केलेली बॅनरबाजी होतेयं; सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

चिंचवड : (Shiv Sainik On Rahul Kalate) भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Patil) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छूकांकडून रस्सीखेच चालू होती मात्र राष्ट्रवादीने नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनेचे इच्छूक असलेले राहुल कलाटे (Rahul Kalate) नाराज झाले, आणि त्यांनी अपक्ष निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान राहुल कलाटे (Rahul Kalate) यांची समजूत काढण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पासून ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचा शब्द डावलून राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहिला मिळत आहे. तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या विरोधात चिंचवड येथील चाफेकर चौकात बॅनर लावण्यात आले आहे.
एका अपक्षची उमेदवारी खोक्यातून… नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दरी, एकदम ओक्के डोक्यातून… खरा शिवसैनिक अशा आशयाचा मजकूर लिहून राहुल कलाटे यांना विरोध दर्शविला आहे. या बॅनरची सद्या सोशल मीडियावर राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. राहुल कलाटे यांनी अर्ज मागे न घेतल्याने शिवसेना त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे देखील शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख सचिन आहीर (Sachin Ahir) यांनी देखील सांगितले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत शिवसैनिकांकडूनच कलाटे यांना विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.

राहुल कलाटेंवर पक्ष एक-दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी शुक्रवारी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन वरून मनधरणी केली होती. काल दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्या आगोदर माघार घेण्यासाठी सकारात्मक होते मात्र कार्यकर्त्यांनसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी मागे न घेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तातडीने सायंकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.