वैवाहिक आयुष्यातील अफवांबद्दल अमृताचे सुटले मौन; म्हणाली, आम्ही 18 वर्षे एकत्र…

मुंबई | अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही अतिशय स्पष्टवक्ती आहे. ती बऱ्याचदा तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकतच अमृता खानविलकर व तिचा पती हिमांशू मल्होत्रा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या बऱ्याच चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या. याबाबत आता अमृताने खुलासा केला आहे.
एका शोमध्ये अमृताने अमृताने याविषयीचे भाष्य केले आहे. हिमांशू व तिच्या नात्याविषयी सुरू असलेल्या अफवांबाबत प्रश्न अमृताला विचारण्यात आले. यावेळी ती म्हणाली, “आम्ही दोघं एकमेकांना फॉलो आणि अनफॉलो करत असतो. आम्हा दोघांना एकत्र राहून 18 वर्ष झाली आहेत. आधी त्याने मला अनफॉलो केलं की आमच्यामध्ये वाद व्हायचे. आताही मी त्याच्याशी भांडते. पण याची आता मला सवय झाली आहे. पण हे अगदीच बालिशपणासारखं आम्ही वागतो.
पुढे ती म्हणते, आम्ही एकमेकांना अनफॉलो केलं की आम्ही एकत्र राहतो की नाही याबाबत अनेक बातम्या पाहायला मिळतात. आम्ही 18 वर्षांपासून एकत्र आहोत. सोशल मीडियाचं वेड आत्ता 8 ते 10 वर्षांपूर्वी आलेलं आहे. आता इतके वर्ष एकत्र राहिल्यानंतर काय फोटो पोस्ट करायचे असं होतं. पण त्यातही आम्ही लग्नाचा वाढदिवस असो वा आमचा कोणाचा वाढदिवस असो आम्ही फोटो पोस्ट करत असतो.
तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल होणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. शिवाय ट्रोल करणाऱ्यांनाही तिने सुनावलं आहे. ट्रोलर्सविषयी तुझं काय मत असं अमृताला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “तुमच्याकडे खूप वेळ आहे बाबा”. असं म्हणत तिने ट्रोलर्सच तोंड बंद केल आहे.