हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करतोय! नताशासोबत उदयपूरमध्ये होणार शाही विवाहसोहळा

जयपूर : (Hardik Pandya And Natasha Wedding) भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करत आहे… होय, हार्दिक पांड्या नताशा स्टॅनकोविकसोबत पुन्हा एकदा लग्न करणार आहे. त्याने डेस्टिनेशन वेडिंगसाठी (Destination Wedding) उदयपुरची निवड केली आहे. हार्दिक आणि नताशा व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) च्या दिवशी पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. आतापर्यंत हार्दिकच्या लग्नाच्या ठिकाणाबद्दल सविस्तर माहिती मिळालेली नाही, कारण हे लग्न अतिशय सिक्रेटपद्धतीने केले जात आहे. हार्दिक-नताशाच्या लग्नात बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 2020 च्या सुरुवातीला हार्दिक पांड्याने नताशासोबत गुपचुप लग्न केले होते. त्यांना एक मुलगाही आहे.
हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांनी मुंबईत कोर्ट मॅरेज केले होते. 31 मे 2020 रोजी हार्दिक आणि नताशा यांनी कोर्टात लग्न केले होते. सध्या त्यांना एक मुलगा आहे. कोरोना काळात लग्नाला कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते. आता पुन्हा एकदा नताशा आणि हार्दिक लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याचं समोर आले आहे. लग्नासाठी हार्दिक-नताशा यांनी उदयपुरची निवड केली आहे. 13 फेब्रुवारीपासून लग्न सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी हार्दिक आणि नताशा पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहेत. क्रुणाल पांड्याने हार्दिक आणि नताशाच्या लग्नासाठी खास प्लॅनिंग केल्याचं समजतेय.
राज्यस्थानमधील उदयपुरला गेल्या काही दिवसांत डेस्टिनेशन वेडिंग्ससाठी पसंती दर्शवली जाते. अनेक सेलिब्रेटींनी येथे लग्न केली आहेत. यामध्ये कियारा-सिद्धार्थ, प्रियंका-निक जोनस, विकी कौशल-कतरिना कैफ यांच्यासह अनेकजणांनी डेस्टिनेशन वेडिंग्ससाठी उदयपुरला पंसती दर्शवली आहे. उदय विलास, लीला, लेक पॅलेस, फतह प्रकाश, जग मंदिर सितारा होटल्स यासारखी ठिकाणं लग्नासाठी निवडली जात आहेत.
कोरोना काळात हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक लग्नबंधनात अडकले होते. नताशा स्टॅनकोविक बॉलिवूड अभिनेत्री आहे. नताशा ही सर्बियन मॉडल आणि अभिनेत्री आहे. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमातून नताशानं बॉलिवूड डेब्यू केला होता. बिग बॉस सिझन 8 आणि रॅपर बादशाहच्या डिजे वाले बाबू मेरा गाना चला दे, या गाण्यातून नताशा प्रकाशझोतात आली होती. डान्स रिअॅलिटी शो नच बलिएमध्येही नताशा अली गोणीसोबत सहभागी झाली होती. 2012 मध्ये अभिनयात करिअर करण्यासाठी भारतात आलेल्या नताशाने शाहरुख खानच्या झीरो सिनेमातही छोटी भूमिका साकारली होती.