ताज्या बातम्यामनोरंजन

शिव ठाकरे आणि उर्फी जावेद सोबत काम करणार?

मुंबई | छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’ अलीकडेच संपला. यानंतर आता स्टंटवर आधारित शो ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या सीझनची चर्चा रंगली आहे. खतरों के खिलाडी शो मध्ये बिग बॉस 16 मधील काही स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे स्पर्धक धोकादायक स्टंट करताना दिसतील आणि या दरम्यान उर्फी जावेदबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मॉडेल आणि उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते, यावेळी मात्र की खतरों के खिलाडीमुळे चर्चेत आली आहे. ती या शोमध्ये सहभागी होणार असल्याच बोललं जात आहे.

उर्फी जावेद लवकरच रिअॅलिटी टेलिव्हिजनवर विश्वात पुनरागमन करणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ‘खतरों के खिलाडी 13’ च्या टीमने तिच्याशी संपर्क साधला असून, तिने होकारही दिला आहे. त्यामुळे उर्फी लवकरच रोहित शेट्टी आणि इतर स्पर्धकांसोबत शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेत जाण्याची शक्यता आहे.

उर्फी व्यतिरिक्त खतरों के खिलाडी 13 साठी शिव ठाकरेची चर्चा असल्याच बोललं जात आहे. शिवाय या शोमधील अर्चना गौतम, सुंबूल तौकीर खान यांचेही नाव खतरों के खिलाडी 13 साठी समोर येत आहे. गेल्यावर्षी मुन्नवर फारुकीचे नाव रोहित शेट्टीच्या शोसाठी जवळपास नक्की झाले होते, पण तो या शोमध्ये दिसला नव्हता. मात्र यावर्षी पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा आहे. तर अलीकडेच ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत दिसलेला नकुल मेहताही KKK13 मध्ये दिसू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये