अर्थताज्या बातम्यादेश - विदेश

अदानी समूहाला उतरती कळा? रोज कंपनीचे शेअर्स घसरतात, आज सर्वोच्च न्यायालयाचा दणका!

नवी दिल्ली : (Gautam Adani’s plea was dismissed by the Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाने अदानी समुहाबद्दल प्रसिद्ध करण्यात आलेल्या हिंडनबर्ग अहवाल प्रकरणात अदानींना मोठा दणका दिला आहे. माध्यम वार्तांकनासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वकील एमएल शर्मा यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर आज सुनावणी पार पडली त्यावेळी न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले, “आम्ही मीडियाच्या विरोधात कोणताही आदेश देणार नाही. आम्ही तेच करू जे आम्हाला करायचं आहे. आम्ही आमचा आदेश जारी करू.” एमएल शर्मा यांनी हिंडनबर्ग अहवालाच्या विरोधात चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. तसंच जोवर यासाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती स्थापन होत नाही, तोवर याप्रकरणी माध्यमांचं वार्तांकन होऊ नये, अशी मागणीही केली होती.

त्यामुळे हा गौतम अदानींसाठी मोठा दणका मानला जात आहे. रोज कंपनींच्या शेअर्समध्ये घसरण होत असतानाच आता ही आणखी एक धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये