ताज्या बातम्यादेश - विदेश
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल
![काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल sonia gandhi](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/sonia-gandhi-780x470.jpg)
नवी दिल्ली | Sonia Gandhi Hospitalised – काँग्रेस (Congress) नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीतील (Delhi) सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
सोनिया गांधी यांना गुरुवारी (2 मार्च) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच सध्या त्या डॉ. अरुप बासू आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली आहेत.
वृत्तानुसार, सर गंगाराम रुग्णालय प्रशासनानं सांगितलं की, सोनिया गांधींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर विविध चाचण्या सुरू आहेत. तसंच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही रुग्णालयानं सांगितलं.