महिलांनो बिनधास्त करा सोन्याची खरेदी! महिला दिनानिमित्त पुण्यात सोन्याचे भाव घसरले

पुणे | महिला सशक्तीकरण, महिला शिक्षण आणि अधिकार प्रदान करण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी त्याबाबतची जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचाही प्रयत्न केला जातो. बदलत्या काळानुसार आता महिला दिनाकडे महिलांप्रती आदर भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही पाहिलं जातं. यासाठीच आज आम्ही तुमची आई, बायको, बहिण, मैत्रिणीला काही गिफ्ट देऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. तुम्हाला ऐकून आनंद वाटेल की आज महिला दिनानिमित्त पुण्यात सोन्याचे दर घसरले आहे.

पुण्यात आज (8 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 56698 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 51973 आहे.

पुण्यात मंगळवारी (7 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 57520 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52727 इतका होता. मंगळवारच्या तुलनेत सोन्याचे दर कमी झाले आहेत.

आज (8 मार्च) 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 5669 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 5197 इतका आहे.

पुण्यातील आजचा चांदीचा दर हा 65500 रुपये प्रतिकिलो आहे.

पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.