ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

सर्वसामान्यांना दिलासा! आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार लिंक

मुंबई | PAN-Aadhaar Linking – सर्वसामान्यांना आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारनं आता आधार कार्ड (Aadhar Card) पॅन कार्डला (PAN Card) लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. आता 30 जूनपर्यंत आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. याअगोदर ही मुदत 31 मार्चपर्यंत होती. तसंच आता ही मुदत सरकारनं वाढवल्यानं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (PAN-Aadhaar Linking)

आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली असली तरी दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लोकांचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करायचं राहीलं असेल त्यांना 1000 रूपये दंड भरून ते लिंक करता येणार आहे.

दरम्यान, याआधी आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत ही 31 मार्चपर्यंत होती. तसंच अनेक नागरिकांचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक नाहीयेत. त्यामुळे लिंकिंग करण्यासाठी लोकांची धावपळ उडाली. तर सर्व्हर प्राॅब्लेम असल्याच्याही तक्रारी येत होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये