ट्विटरवर आजपासून शुल्कसक्ती, पैसे न भरलेल्या अकाऊंट्सचे ब्लू टिक हटवणार
Twitter Blue Tick : ट्विटर (Twitter) तुम्ही अजूनही ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन घेतले नसेल तर तुमच्या ट्विटरवरील ब्लू टिक आजपासून हटवली जाणार आहे. कारण शुल्क न भरलेल्या व्हेरीफाइड अकाऊंट्सचे ब्लू टिक काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भारतात ब्लू टिकसाठी 900 रुपये प्रति महिना मोजावे लागणार आहे. एलन मस्ककडून ट्विटरच्या सीईओ पदाची धुरा सांभाळल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले आहे. त्यातला हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
ट्विटर ब्लू टिक एक प्रीमियम सर्व्हिस आहे. जी पूर्णपणे पेड आहे. यासाठी मंथली सब्सक्रिप्शन घेणे आवश्यक आहे. ट्विटरचे अँड्रॉयड आणि iOS यूजर्ससाठी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनसाठी भारतात 900 रुपये मोजावे लागणार आहे येते. तर वेब यूजर्ससाठी याची किंमत फक्त 650 रुपये आहे. ट्विटर यूजर्स 6 हजार 800 रुपयांचे वार्षिक सब्सक्रिप्शन घेवू शकता.
ब्लू टीक ही फक्त प्रसिद्ध प्रोफाईल असणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत होती. यामध्ये राजकीय नेते, समाज कार्यकर्ते, सेलिब्रिटी, शास्त्रज्ञ आदी लोकांचा समावेश होता. आता कोणालाही पैसे देऊन ब्लू टीक घेता येणर आहे. मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून व्हेरीफिकेशन होणार आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर कंपनी विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. ट्विटरवरील बनावट अकाऊंट्सना आळा घालण्यासाठी एलॉन मस्क यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे तुम्ही अद्याप ट्विटर ब्लू (Twitter Blue) चं सबस्क्रिप्शन घेतलं नसेल 1 एप्रिल नंतर तुमच्या अकाऊंटवर फ्री ब्लू टिक हटवण्यात येईल.