ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिंदेंचे 40 आमदार अन् भाजप तरी उद्धव ठाकरेंची तगडी फाईट! शिंदे-फडणवीस ताईट?

मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मजबूत परिस्थितीत आले आहेत. याचे संकेत छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत मिळाले. खेड आणि मालेगावमधील मोठमोठ्या सभांनी पक्षात फूट पडल्यानंतरही झालेली गर्दी पाहता. उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार असल्याचा संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचा मोठा आधार हा ‘ठाकरे’ घराण्याशी निगडित भावना आहेत. सामान्यांच्या मनात ठाकरे घराण्याबाबत असलेल्या भावना आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाकरे घराण्यावरील निष्ठा हा शिवसेनेत मोठा घटक मानला जातो. याची उद्धव ठाकरे यांना निवडणुका जिंकण्यासाठी मदत होऊ शकते. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह अनेक सदस्य अजूनही उद्धव यांच्यासोबत आहेत. यावरून त्यांचा संघटनात्मक पाया मजबूत असल्याचे दिसून येते.

२०१४ मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुकानंतर जेव्हा शिवसेना दोन नंबरचा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताकदीचा अंदाज आला होता. राज ठाकरे देखील उद्धव ठाकरेंसमोर टिकू शकले नाही. आदित्य ठाकरे यांच्या सभेला होत असलेल्या गर्दीने देखील भाजपला घाम फोडला. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदे सोबत असूनही चिंतेत आहे. त्यामुळे ठाकरेंची सभा होते, त्या ठिकाणी परत सभा घेतल्या जाते.

अजूनही सर्वसामान्य शिवसेना कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा आहे. त्यांना असलेला पाठिंबा अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे, ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. याशिवाय मुस्लीम समाजातूनही ठाकरेंना पाठिंबा वाढला आहे. मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेल्या मालेगाव येथील सभेत त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. एकनाथ शिंदे, ४० आमदार आणि भाजप जेवढी गर्दी सभेला जमवतात. तेवढी गर्दी हे फक्त उद्धव ठाकरे जमवतात. यावरुन सामान्यांच्या मनात ठाकरे घराण्याप्रती असलेली निष्ठा स्पष्ट होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये