Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer: सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) ‘किसी का भाई किसी का जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाच्या माध्यमातून दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. दबंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये सलमानचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला ‘मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं’ हा सलमानचा डायलॉग ऐकू येत आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त तडका बघायला मिळत आहे. सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता सलमानानं इन्स्टाग्रामवर ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करुन त्यानं लिहिलं, ‘तुमच्या भाई आणि जानसोबत तुम्ही हा ट्रेलर पाहिलात?’ हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.