अजित पवारांनी पंतप्रधानांचं केलं कौतुक; म्हणाले, “आज नरेंद्र मोदी यांच्यानंतर…”

मुंबई | Ajit Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतुक केलं आहे. भाजपला (BJP) पूर्ण बहुमत कधीच मिळालं नव्हतं पण ते बहुमत मिळवून देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे, असं अजित पवार म्हणाले. ते ‘सकाळ’ या वृत्तसमुहाने घेतलेल्या मुलाखतीत बोलते होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “भाजपकडे लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखं मोठं नेतृत्व होतं. पण त्यांना जे जमलं नाही ते पंतप्रधान मोदींनी करून दाखवलं आहे. भाजपला कधीच पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. ते बहुमत मिळवून देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे.”
“देशात 1984 नंतर पहिल्यांदा 2014 साली बहुमत असलेलं सरकार अस्तित्वात आलं. काँग्रेसचं सरकार असताना डाॅ. मनमोहन सिंग यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागली होती. पण त्यानंतर देशात पंतप्रधान मोदींनी आपला करिश्मा निर्माण केला, हे नाकारता येणार नाही. तसंच आज नरेंद मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला तर कोणतंही नाव समोर येत नाही”, असंही अजित पवार म्हणाले.