देश - विदेश
महाराष्ट्र दौरे वाढले? PM मोदींची डिसेंबरमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर हजेरी; नौदलाचाही सहभाग

मुंबई : (PM Modi tour on Maharashtra) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. डिसेंबरमध्ये त्यांचा हा दौरा असणार आहे. यापूर्वी पंतप्रधान १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. पुण्यात त्यांना टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
भारतीय नौदल आणि राज्य सरकारच्यावतीनं या दौऱ्याचं आयोजन केलं जाणार आहे. ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांच्या या दौऱ्याबाबतचं नियोजनावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.