धोनी कॅप्टन नसता तर … गौतम गंभीरच मोठं वक्तव्य !

Gautam gambhir on dhoni :
2011 मध्ये वनडे वर्ल्ड कपमधील विश्वचषक विजेत्या संघातील गौतम गंभीर याने याबाबत वारंवार वक्तव्य करत वाद ओढावला होता. धोनीच्या फक्त षटकारामुळेच आपण विश्वचषक जिंकला नाही, संपूर्ण संघाला क्रेडिट दिले पाहिजे, असे गौतम गंभीर त्यावेळी म्हणाला होता. गंभीर याच्या या वक्तव्यानंतर अनेक टीकास्त्र होते. पण आता गौतम गंभीरने आता धोनीचे कौतुक केलेय.
पण आता त्याच गौतम गंभीरने माजी कर्णधार एमएस धोनी याचे कौतुक केले आहे. धोनीने टीमच्या विजयासाठी आणि चषकासाठी आंतरराष्ट्रीय धावांचे बलिदान दिल्याचे गंभीर म्हणाला. माजी फलंदाज म्हणाला की, धोनी त्याच्या कारकिर्दीत अधिक धावा करू शकला असता, परंतु त्याने संघाला स्वतःच्या पुढे ठेवले आणि त्यामुळेच भारतीय संघ इतका यशस्वी ठरला.
“एम एस धोनीने संघासाठी आणि ट्रॉफीसाठी आंतरराष्ट्रीय धावांचे बलिदान दिले आहे. जर तो कर्णधार नसता तर तो भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज असता. तिसऱ्या क्रमांकावर धोनीने अधिक धावा केल्या असत्या पण त्याने संघाला पुढे ठेवत त्याच्यातील फलंदाजाचा त्याग केला.” असं वक्तव्य गौतम गंभीरने ‘स्टार स्पोर्ट्स’वर बोलताना धोनीचे कौतुक करताना केले.
धोनीच्या नेतृत्वात भारताने अखेरची आय़सीसी स्पर्धा जिंकली होती. २०१३ पासून भारताला विजय मिळाला नाही. टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने शेवटची ICC ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून भारताला फक्त आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा आहे.