अर्थताज्या बातम्यादेश - विदेश

गुंतवणूकदारांना आजही दणका! शेअर बाजारात सेन्सेक्ससह नेफ्टीतही मोठी घसरण

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा घसरण दिसून आली. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) 570 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीतही (NSE Nifty) घसरण होऊन 19,750 अंकांवर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप (Mid Cap) आणि स्मॉल कॅप (Small Cap) शेअर्स इंडेक्समध्येही जवळपास एक टक्क्यांची घसरण दिसून आली. आजच्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.

सलग तीन ट्रे़्डिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने घेतलेल्या निर्णयाने बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 570.60 अंकांच्या घसरणीसह 66,230.24 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 152.25 अंकांनी घसरून 19,749.15 अंकांवर बंद झाला.

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर, निर्देशांकातील 50 पैकी 34 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.

महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 2.88 टक्क्यांची घसरण दिसून आली. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 2.81 टक्क्यांची, सिप्लामध्ये 2.47 टक्क्यांची घसरण झाली आहे. एसबीआयच्या शेअर दरात 2.20 टक्के, इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 2.04 टक्क्यांची घसरण दिसून आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये