धनगर समाज आरक्षण! मुख्यमंत्र्यांनी एवढी सकारात्मकता दाखवल्यावर निश्चित मार्ग निघेल; फडणवीस
![धनगर समाज आरक्षण! मुख्यमंत्र्यांनी एवढी सकारात्मकता दाखवल्यावर निश्चित मार्ग निघेल; फडणवीस Devendra Fadnavis 21](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/Devendra-Fadnavis-21-780x470.jpg)
पुणे : (Devendra Fadnavis On Dhangar Reservation) आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन तीन दिवस झाले.त्या निमित्ताने भाजपचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. त्यानंतर शहरातील इतर मंडळाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले.
फडणवीस म्हणाले, मी दरवर्षी पुण्यात येऊन मानाच्या गणपतीचे दर्शन घेत आहे. पुण्याचे आणि गणेशोत्सवाचे नाते आहे. पुणे शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव देशभर पोहोचला आहे. त्याची खरी सुरुवात पुण्याने केली आहे. गणरायाने सर्व विघ्न दूर करावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्य सरकारने हा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी एवढी सकारत्मकता दाखवल्यावर निश्चित मार्ग निघेल अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.